चंद्रपूर: परसोडा येथे प्रवासी निवारा उभाराःशुभम आमने यांची आमदार करण देवतळे यांच्याकडे मागणी
चंद्रपूर जिल्ह्यातील परसोडा येथे बसथांबा असून देखील प्रवाशांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. खैरगाव आणि परसोडा या दोन गावांचा एकच बसथांबा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी या ठिकाणी थांबतात. वरोरा-चिमूर महामार्गाचे काम सुरू होताना या ठिकाणी असलेला जना प्रवासी निवारा पाडण्यात आला.