खटाव: वर्धनगड घाटात उस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला मालट्रकची धडक; ऊस वाहतुकीमुळे अपघातांची मालिका कायम
Khatav, Satara | Nov 30, 2025 सातारा–लातूर महामार्गावरील कोरेगाव–खटाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वर्धनगड घाटात ऊस वाहतुकीमुळे अपघातांची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रॅक्टर–ट्रॉलीला वेगाने येणाऱ्या मालट्रकने धडक दिल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्यामुळे घाटातून उसाचे ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर वाहने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर धावत आहेत. त्यातच तीव्र उतार व वळणे असल्याने हा घाट अपघातप्रवण आहे.