उमरेड: उमरेड हद्दीत माजी आमदार पारवे बंधू यांच्या नेतृत्वात निघाली भव्य प्रचार रॅली
Umred, Nagpur | Nov 24, 2025 सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्थानीय नेत्यांच्या प्राणप्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहे. दरम्यान उमरेड येथे आज भाजपातर्फे भव्य प्रचार रॅली काढण्यात आली यामध्ये माजी आमदार सुधीर पारवे व राजू पारवे या दोन्ही बंधूंचा समावेश होता. यादरम्यान आता उमरेड नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.