संगमनेर: पिंपळनेरगाव परिसरात बिबट्याचा दहशतवाद; वनविभागाविरोधात ग्रामस्थांचा संताप
पिंपळनेरगाव परिसरात बिबट्याचा दहशतवाद; वनविभागाविरोधात ग्रामस्थांचा संताप संगमनेर तालुका : संगमनेर तालुक्यातील पिंपळनेरगाव व परिसरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मागील आठवड्यात बिबट्याने ग्रामस्थ किशोर राहील यांच्या शेळीवर हल्ला करून ठार केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रमेश वाकचौरे यांच्या पत्नीवर बिबट्याने जीवघेणा हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले.