सिन्नर: पांढुर्ली येथे शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी गेलेल्या शेतक-यावर बिबट्याचा हल्ला
Sinnar, Nashik | Oct 5, 2025 सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे आज दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. बाळकृष्ण अर्जुन पवार (वय ५५) हे आपल्या शेतात भाताच्या लागवडीसाठी पाणी सोडण्यासाठी साई संस्थानजवळील नर्सरी परिसरातील विहिरीवर गेले होते. मोटरचे बटण सुरू करून मागे वळताच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप घेतली.