धारूर: वंचित बहुजन आघाडीचा धारुर तहसीलवर मोर्चा
Dharur, Beed | Oct 8, 2025 धारूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवार दि 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता विराट जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान, कर्जमाफी, गायरान धारकांना सातबारा, तसेच अनुसूचित जमातींच्या प्रलंबित जातप्रमाणपत्रांची मागणी करण्यात आली. रमाई आणि पंतप्रधान योजनांतील हप्ते तात्काळ देण्याची, तसेच निराधार योजनांतील पगार वेळेवर देण्याची मागणीही यावेळी झाली.या मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष इंजिनिअर प्रशांत उघडे यांनी केले. जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, म