लाखांदूर: कुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो महिला व पुरुषांनी केली तपासणी
सरकारच्या आरोग्य विभागाच्या सुदृढ नारी सक्षम कुटुंब अभियानांतर्गत आयोजित आरोग्य शिबिरामध्ये शेकडो महिला व पुरुषांचे विविध आजारांवर आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले हे शिबिर तारीख 26 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत खुडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जि प सदस्या विशाखाताई माटे यांच्या हस्ते करण्यात आले होते