पवनी: शेतीच्या वादातून महिलेला लाकडी कघटनाे मारल्याने हात फ्रॅक्चर ; वायगाव येथील घटना
Pauni, Bhandara | Oct 19, 2025 १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या झोपडीत हजर असताना आरोपीने त्याच्या शेतातील धान कापण्यासाठी हार्वेस्टर मशीन आणली होती. तेव्हा फिर्यादी महिलेने हार्वेस्टर मशीन चालविणाऱ्या ड्रायव्हरला झोपडी जवळुन धान आरामात काप मशीन माझ्या झोपडीला लागेल तर झोपडी पडून जाईल अशी बोलली त्यावेळी आरोपीने तिला शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली व झोपडीसमोर असलेल्या लाकडी काठीने मारून जखमी केले. यात महिलेच्या हाताला लागून हाड फ्रॅक्चर झाले असल्याचे एक्स-रे रिपोर्ट मध्ये नमूद आहे.