बोदवड: कुऱ्हा या गावातून हद्दपार करण्यात आलेला तरुण धोपेश्वर रिक्षा स्टॉप वर आढळला,तरुणा विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Nov 16, 2025 कुऱ्हा या गावातून आकाश उर्फ संतोष विष्णू रावळकर वय २५ या तरुणाला उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र सदर तरुणाने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करीत तो कुऱ्हा या गावातील धुपेश्वर रिक्षा स्टॉप वर मिळून आला. तेव्हा त्याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.