पाच लाखांचे ईलेक्ट्रिक वायर लंपास,सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 26, 2025
छत्रपती संभाजीनगरः बांधकाम साईटवरील स्टोरेज रूमचे लॉक तोडून वॉचमन व सुरक्षा गार्ड यांनी 4 लाख 92 हजार 340 रुपयांचे ईलेक्ट्रीक वायर बंडल लंपास केल्याची घटना गोलवाडी परिसरात घडली. या प्रकरणी आरोपींवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.