लातूर :-पंढरपूर–तिरुपती व्हाया लातूर या साप्ताहिक रेल्वे सेवेला १३ डिसेंबरपासून सुरूवात होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी दिली.पंढरपूर (जि. सोलापूर) – तिरुपती या धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणांदरम्यान रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून भाविक आणि प्रवासी व्यक्त करत होते. दिनांक १० ऑक्टोबर रोजी झालेल्या रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत ही मागणी निलेगावकर यांनी ठामपणे मांडली.