नागपूर ग्रामीण: बुटीबोरीत भीषण अपघात, अज्ञात टिप्परच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बुटीबोरी येथे 16 सप्टेंबरला झालेल्या अपघातात एका तरुणाच्या जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. मृतक तरुणाचे नाव अविनाश वाळके असे सांगण्यात आले आहे. तर जखमी तरुण प्रदीप वरटीचा उपचार रुग्णालयात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघेही दुचाकीने जात असताना बुटीबोरी एमआयडीसी चौकाजवळ एका भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली या दरम्यान एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचार रुग्णालयात सुरू आहे.