चिखली: दिवाळी येण्यापूर्वीच आमदार महाले यांनी केले आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना फराळाचे वितरण
उजेड देऊ त्यांच्या हाती, जे पिकविती मातीतून मोती!दिवाळी सण येण्यापूर्वीच पावसाने निर्दयीपणे आपल्या शेतकरी बांधवांचे सर्वस्व हिरावले असले तरी आपण सर्व जण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. प्रकाशोत्सव दीपावली सर्वत्र आनंदात साजरा होत असताना आपल्या चिखली मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना घरोघरी जाऊन दिवाळी फराळाचे वितरण आपण सुरू केले असून ही बळीराजाप्रति कृतज्ञता आणि अल्पशी भेट आहे.