बार्शी: माणुसकीचा मेजर धडा: पूरग्रस्तांसाठी सहकाऱ्यांसह उभे ठाकले 'नाना'; वैराग पोलीस ठाण्यात मदत
पूरग्रस्तांसाठी पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आवाहनाला बार्शी तालुक्यातील हळदुगे गावचे माजी सैनिक ‘मेजर नाना’ सुखदेव जगताप यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी १२ जीवनावश्यक वस्तूंनी सज्ज अशा १५ किट्स तसेच अतिरिक्त रोख मदत जमा करून वैराग पोलिस ठाण्यात सुपूर्द केली. सदरची मदत ही 1 ऑक्टोबर दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या पुढाकारामुळे पूरग्रस्तांना दिलासा तर मिळालाच, शिवाय माणुसकीची खरी उज्ज्वल बाजू समाजासमोर आली आहे.