रिसोड: करडा येथे कृषिदूतांकडून शेतकर्यांना युरिया मिश्रीत चारा उपचाराचे प्रात्याक्षिक
Risod, Washim | Oct 31, 2025 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न सुविदे फाऊंडेशन कृषी विद्यालय रिसोड अंतर्गत ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत दत्तक ग्राम करडा येथे कृषीदूतांनी शेतकर्यांना युरिया वापरुन चार्यावर उपचार करण्याचे प्रात्याक्षिक दाखविल्याची माहिती दि. 31 ऑक्टोबर रोजी दिली. यावेळी सरपंच वसंतराव देशमुख, गजानन देशमुख, अशोकराव देशमुख, शेतकरी बांधव, कृषीतज्ञ शिक्षक व कृषी दूत विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.