गडचिरोली: वनहक्क व लाल पट्ट्यातील शेतीचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या सुरजागड लाॅड्स मेटल कंपनीची चौकशी करा - योगाजी कुडवे
सुरजागड लॉडस मेटल कंपनी स्वतःचा अस्थित्व निर्माण करण्यासाठी मौजा हेडरी, बांडे, परसालगोंदी लागून असलेल्या अनेक गावातील आदिवासीं समाज बांधवाच्या शेतीचा बेकायदेशीरपणे वापर करीत आहे. त्याची चौकशी करावी व सदर कंपनी विरोधात गुन्हा नोंद करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे जिल्हाधिकारी कार्यालया समोर येत्या २० ऑगष्ट पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती आज इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.