चंद्रपूर: नवेगाव मोरे येथील आरोग्य केंद्रात डॉक्टरांची गैरहजेरी; रुग्णाचा मृत्यू,
संतप्त नातेवाइकांचा ठिय्या आंदोलन
नवेगाव मोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे एका रुग्णाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री घडली. वैद्यकीय - दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाइकांनी दवाखान्यातच मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन केले. तब्बल दहा तास आंदोलन झाल्यानंतर आरोग्य प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून कारवाईचे आश्वासन दिले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बंडू सलामे (५५, रा. नवेगाव मोरे) असे मृत रुग्णाचे नाव आहे.