देवणी तालुक्यातील बोरोळ गावचा सुपुत्र कु. आकाश नामदेव म्हेत्रे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून वर्ग–१ अधिकारी पद मिळवले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे! आकाश यांच्या आई-वडिलांनी कठीण परिस्थितीत कष्टाचे थेंब गाळत मुलाला शिक्षणाची संधी दिली, आणि आकाश यांनी त्या त्यागाचे मोल सतत प्रयत्न व चिकाटीने फेडले. त्यांच्या या यशामागे असलेले संघर्ष, शिस्त आणि सातत्य प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरेल.