कोरपना: शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख कामगार नेते बंडू हजारे यांची माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासना विरोधात गुन्हे दाखल
कोरपणा तालुक्यातील गडचंदूर येथील कंपनीत स्थानिक सुरक्षा रक्षक व स्थानिक कामगारांचे शोषण होत असून माणिकगड कंपनी प्रशासन सेक्युरिटी गार्ड कंपनी मिळून सुरक्षा रक्षकांचे पाच ते सहा कोटी रुपये आपसात वाटून खाल्ल्याचे सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची पाळी आलेली आहेत असा थेट आरोप शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी केला असून कंपनीच्या विरोधात 16 सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान तक्रार दाखल केली.