सेलू: हिंगणी येथे गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या तिघांवर सेलू पोलिसांची कारवाई;
दारूसह ₹८०,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त
सेलू
Seloo, Wardha | Nov 9, 2025 हिंगणी येथे गावठी मोहा दारू दुचाकीवरून वाहतूक करणाऱ्या तिघांवर सेलू पोलिसांनी कारवाई करत एकूण ₹८०,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सलमान इस्त्राईल पठाण (वय २२) व पुरुषोत्तम चिवलुजी नाईक (वय ५६), दोघेही रा. हिंगणी, यांना अटक करण्यात आली असून पंढरी रामदास जुगनाके (रा. हिंगणी) हा आरोपी पसार आहे. याप्रकरणी शनिवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अशी माहिती ता. ९ ला सेलू पोलिसांकडून मिळाली.