वृध्द साहित्यिक कलावंत मानधन योजनेत बोगस लाभार्थ्यांनी घुसखोरी केली असून खरे आणि गरजू लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांचे नावे यादीतून वगळण्यात यावेत यासाठी वृध्द कलावंतांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केलंय. गुरुवार दि. 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध साहित्यिक व लोककलावंतांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनही सादर केलंय. सन 2021-22 ते 2024-25 या कालावधीतील वृद्ध साहित्यिक कलावंत मानधनासाठी बोगस नावाचा समावेश केला.