महाबळेश्वर: शिवसागर जलाशयातील तापोळा विभागात बोटचालक-मदतनिसांना दिवाळीची भेट; राज्य सरकारकडून पुढील पाच महिन्यांच्या पगारासाठी निधी
कोयना धरणामुळे शिवसागर जलाशयाची निर्मिती झाली असून महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथे जल वाहतुकीसाठी कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी त्याचबरोबर बार्ज आणि लॉन्चेसच्या देखभाल दुरुस्तीसाठी राज्य सरकारने तब्बल २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बोटचालक व मदतनिसांचे पाच महिन्याचा पगाराचा प्रश्न निकाली निघाला आहे. मंत्री पाटील यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजता माहिती दिली.