धरणगाव चोपडा रोडवरील शासकीय आयटीआयच्या गेट समोरून अवैधपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता केलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ८८ हजार ६२५ रुपये किमतीचा गांजा आणि दुचाकीसह एकूण मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गुरूवारी ४ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.