अकोला: महापरिनिर्वाण दिनी विद्यापीठातील कार्यक्रम पुढे ढकला, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची मागणी
Akola, Akola | Dec 3, 2025 अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 6 डिसेंबर रोजी होणारा स्पर्धा परीक्षा फोरमचा 23 वा वर्धापन दिन महापरिनिर्वाण दिनाला विरोध असल्याने पुढे ढकवण्याची मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना निवेदनाद्वारे केली. 6 डिसेंबर हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाचा दिवस असून अनुयायी या दिवशी कोणताही उत्सव साजरा करत नाहीत.