गोंदिया: खमारी येथील दोन मुलांचे अपहरण, ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तालुक्यातील ग्राम खमारी येथील इयत्ता नववी व दहावीत शिकणारे दोन अल्पवयीन मुले घरातून बाहेर पडून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शनिवारी (दि.१) सकाळी ११ वाजता ते दोघेही गोंदियाला गेले होते. दोन दिवसाने घरी येणार असे सांगून गेलेले ते दोघे परतलेच नाही. या घटनेसंदर्भात ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ..........