अकोट: श्री स्वामी समर्थ केंद्रात 450 महिला व पुरुष सेवेकऱ्यांचा श्री गुरुचरित्र वाचनाचा संकल्प यज्ञ
Akot, Akola | Dec 3, 2025 श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी उत्साहाचे औचित्य साधून श्री दत्त जयंती उत्सव औचित्य साधून अखंड नामजप यज्ञ व 450 महिला व पुरुष सेवेकऱ्यांचा श्री गुरुचरित्र वाचनाचा संकल्प यज्ञसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 नोव्हेंबर ला ग्रामदेवता सन्मान मंडल मांडणी व पूर्वतयारी करण्यात आली. सप्ताह दरम्यान श्री गणेशयाग, मनोबोध याग,3 श्री स्वामी याग संपन्न झाला. या अखंड नामजप यज्ञ सप्ताहात450 महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी सहभाग घेतलाय