राहुरी: राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौकात श्री मोटर्स दुकान फोडून चोरट्याने लुटला लाखोंचा मुद्देमाल
राहुरी फॅक्टरीतील वैष्णवी चौक येथील रवी कदम यांच्या श्री. मोटर्स येथील दुकानात काल रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरी करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. आज गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.