पवनी तालुक्यातील पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद मारुती मेंढे आणि जेसीबी-ट्रॅक्टर मालक नितेश श्रीकृष्ण मोटघरे (वय ३२, रा. विरली खंदार) यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. ७४ हजार रुपयांची भाडेथकबाकी देण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप करत जेसीबी मालकाने थेट कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. मार्च २०२५ मध्ये मुरूम टाकण्याच्या कामासाठी नितेश मोटघरे यांनी आपली जेसीबी व ट्रॅक्टर उपसभापती प्रमोद मेंढे यांना भाड्याने दिली होती.