मुळशी: ऑनलाइन कर्जाच्या नावाखाली फसवणूक, दापोडीतील फुगेवाडी परिसरातील घटना
Mulshi, Pune | Oct 15, 2025 समाजमाध्यमातील व्हॉट्सॲप आणि फोनद्वारे संपर्क साधून कर्ज मंजूर करून देतो असे सांगून एका व्यक्तीकडून कागदपत्रे घेतली आणि त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या नावाने २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले.तसेच, पाच लाख रुपयांच्या लोनसाठी प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली २३ हजार ८१४ रुपये ऑनलाइन वळती करण्यास सांगून ३० हजार ५९१ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली.