नांदुरा: टाकळी वतपाळ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ; राज्यात पहिला क्रमांक मिळवण्याचा गावकऱ्यांचा संकल्प
ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आज 17 सप्टेंबर रोजी शुभारंभ करण्यात आला. नांदुरा तालुक्यातील टाकळी वतपाळ येथे सुद्धा या अभियानाचा शुभारंभ सकाळी दहा वाजता करण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हा महाराष्ट्र शासनाचा शंभर दिवसाचा उपक्रम असून यामध्ये गावागावात विविध विकास कामे व विविध सेवा देण्यात येणार आहेत.