पलूस: पलूस तालुक्यात बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना,बापाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम बाप अटकेत
Palus, Sangli | May 23, 2025 पलूस तालुक्यात बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी आणि धक्कादायक संतापजनक घटना घडली आहे सदरची घटना पलूस तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. 36 वर्षीय नराधम बापाने त्याच्याच 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पलूस पोलिस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांखाली नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नराधम बापाला पलूस पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पलूस पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.