पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीत, प्लॉट नं. ३३, गेडाम ले-आउट येथे राहणारे फिर्यादी विरेंद्रसिंग महेंद्र सिंग है,हे त्यांचे राहते घराला कुलुप लावुन परिवारासह नातेवाईकाचे लग्नाला बाहेरगांवी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप व कडीकोंडा तोडुन, घरात प्रवेश करून, बेडरूम मधील लोखंडी कपाटातील रोख २२,०००/- रू व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १,६२,७००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.याप्रकरणी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.