हिंगोली: जिल्हा परिषद मैदानावर वंदे मातरम ची 150 वर्ष
भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा
हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदानावर वंदे मातरम ची 150 वर्ष भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन आज दिनांक सात नोव्हेंबर ला साजरा करत सामूहिक वंदे मातरम चे गायन करण्यात आले. यावेळी वंदे मातरम् गीता संदर्भात सखोल माहिती देण्यासाठी मुख्य वक्ता म्हणून कृष्णा देशमुख आले होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता. क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, आदी उपस्थित होते