उदगीर: ३० ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
Udgir, Latur | Oct 27, 2025 उदगीर शहरात उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य महामानव भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामाचे भूमिपूजन ३० ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार डॉ शिवाजीराव काळगे, लातूर जिल्ह्यातील सर्व आमदार यांच्या हस्ते पार पडणार आहे,या कार्यक्रमाला, उदगीर जळकोट मतदार संघातील नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आमदार संजय बनसोडे यांनी केले आहे.