धुळे: टीईटी परीक्षेच्या तयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा; सुरळीत आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे समन्वयाचे निर्देश
Dhule, Dhule | Nov 11, 2025 धुळे जिल्ह्यात येत्या २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत सर्व संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.