आज रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 12 ते दुपारी तीन वाजेपर्यंत दिवाणी व फौजदारी न्यायालय कळमेश्वर येथे फायलिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण न्यायाधीश राठोड सर व मांडवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ई फाइलिंग कशा प्रकारे केली जाते हे सर्व वकिलांना समजावून सांगण्यात आले यावेळी सर्व वकीलवर्ग न्यायालयीन कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते