जामखेड: जामखेड तालुक्यातील पंचनाम्यादरम्यान थरारक घटना, सर्पदंश
गावात पंचनाम्याचे काम सुरू असताना एक थरारक प्रकार घडला. तलाठी आकाश केदार यांना अचानक सर्पदंश झाला. ही घटना घडताच गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदत केली आणि त्यांना जवळच्या दवाखान्यात दाखल केले. योग्यवेळी उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला.घटनेची माहिती मिळताच सभापती प्रा. राम शिंदे यांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये भेट देऊन तलाठी आकाश केदार यांची प्रकृती विचारली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली