गोरेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, गोरेगाव येथे गोरेगाव शहर पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, गोरेगाव येथे गोरेगाव शहर पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष स्थान माजी आमदार श्री राजेंद्र जैन व आमदार राजकुमारजी बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी पक्ष संघटनेची सध्याची स्थिती, नगरपंचायत निवडणुकीची तयारी, निवडणुकांमध्ये पक्षाने घ्यायची भूमिका यावर सखोल चर्चा करण्यात आली. शेतकरी, शेतमजूर, युवा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी पक्षाची ताकद राहील असा निर्धार बैठकीत कार्यकर्त्यांनी केला