उदगीर: उदगीरात विदूत तारे जवळ कामगारांची बॅनर बांधणीसाठी जीव घेणी कसरत,बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण
Udgir, Latur | Oct 29, 2025 उदगीर शहरात नेहमी बॅनर बांधणी हा चर्चेचा विषय बनलाय,अनेकवेळा नेत्यांचे बॅनर हे सर्रासपणे विद्युत पोल जवळ बांधण्याचे प्रकार समोर आले आहेत, खांबावर विदूत प्रवाह सुरू असतानाही कामगारांनी जीवाची पर्वा न करता बॅनर बांधतात,उदगीर शहरात २९ ऑक्टोबर रोजी जय जवान चौकात फूट भर अंतरावर विद्युत तारा, तारेतून विद्युत प्रवाह सुरू असताना कामगारांनी स्वतः चे जीव धोक्यात घालून बॅनर उभे करतानाचे दृश्य दिसून आले,जर एखाद्या कामगारांचे बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय.