दिग्रस शहरातील खंडाई रोड परिसरात असलेल्या स्मशानभूमीजवळ मुलीला घेऊन बसलेल्या तरुणांना तेथे बसण्याचे कारण विचारणे फिर्यादी व त्याच्या मित्राला चांगलेच महागात पडले. या वादातून दोन गटात तुफान राडा होऊन लाकडी काठी व दगडाने झालेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाल्याची घटना बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी विजय बंडू पुणेकर (रा. अंबिकानगर, दिग्रस) व त्यांचा मित्र धनंजय परशराम देशपांडे हे जखमी झाले आहेत.