वाशिम: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी 8 तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा, खा.संजय देशमुख यांचे आवाहन
Washim, Washim | Oct 7, 2025 महायुती सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दि 8 ऑक्टोबर रोजी रस्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खासदार संजय देशमुख यांनी दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी केले आहे. या आंदोलनामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करा, हेक्टरी ५०००० हजार रूपये अनुदान जाहीर करा आदी मागण्या करण्यात येणार आहेत.