दिंडोरी: नाशिक ते पेठ रस्त्यावर चाचडगाव टोलनाक्याजवळ स्कार्पिओ ईरटीका गाडी अपघात चार ठार आठ गंभीर ओळख पटवण्याचे काम सुरू
नाशिक ते पेठ रस्त्यावर चाचडगाव टोल नाक्याच्या पुढे पेठ बाजूने सुमारे 500 मीटर अंतरावर नाशिक कडून पेठकडे जाणारी स्कारपिओ GJ 15 CR 7964 व पेठ कडून नाशिक कडे जाणारी इरटीका कार क्रमांक DD 01 AA 9013 यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला असून सदर अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडीतील एक प्रवासी तसेच इरटीका गाडीतील चालक व दोन प्रवासी ज्यामध्ये एक महिला असे एकूण 04 इसम जागेवर मयत झाले . असून एकूण 08 इसम जखमी झाले आहेत.सदर माहिती ही दिंडोरी पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिली आहे