अक्कलकोट: शहरात बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक; अक्कलकोट उत्तर पोलिसात गुन्हा दाखल...
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकाने निरीक्षक अजिंक्य रमेश पवार (रा. सैफुल, सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून त्यांनी चौकशीत दोन प्रकरणे उघडकीस आणली आहेत. चंद्रकांत अनंत रेड्डी (रा. अनगर, मोहोळ) यांच्या पत्नी कल्पना रेड्डी यांनी २४ हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर केले.