घनसावंगी: मालेगाव तालुक्यातील अत्याचार प्रकरणी ।कुंभार पिंपळगाव कडकडीत बंद
कुंभार पिंपळगाव मालेगाव तालुक्यातील तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ शनिवार (ता. २२) येथील व्यापारी महासंघाच्या वतीने कुंभार पिंपळगावात बंद पाळण्यात आला याबाबत घनसावंगीचे पोलिस निरीक्षक केतन राठोड यांना निवेदनही देण्यात आले होते. सर्व व्यापाऱ्यांनी स्वःम स्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवण्यात आले होते.