उदगीर नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर थेट नगराध्यक्षा पदाच्या विजयी उमेदवार स्वाती सचिन हुडे यांनी उदगीर करांचे आभार मानले, उदगीरकरांनी मला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल सर्वांची मी आभारी आहे असे माध्यमासमोर बोलताना सांगितल्या,उदगीर नगरपालिका निवडणुकीत युतीने जोरदार मुसंडी मारत एकूण ४० पैकी ३३ जागेवर विजय मिळवला,नगरपालिका निवडणुकीत युतीच्या कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी योग्य रणनीती आखून नगरपालिका आपल्या ताब्यात खेचून आणली.