रामटेक: रामटेक - तुमसर मार्गावर भंडारबोडी शिवारात रामटेक पोलिसांनी पकडले अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रक
Ramtek, Nagpur | Oct 18, 2025 रामटेक - तुमसर मार्गावरील भंडारबोडी - शिवनी भोंडकी दरम्यान रामटेक पोलिसांनी नाकाबंदी करून अवैधपणे रेतीचे वाहतूक करणारे दोन ट्रक पकडून रामटेक पोलिसांनी यातील 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे.तर एका ट्रकचा चालक हा घटना वेळेपासून फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई 18 ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान करण्यात आली.