भिवंडी: वडिलांसोबत शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीला ट्रेलर ने चिरडले, अंगावर काटा आणणारा अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Bhiwandi, Thane | Nov 27, 2025 भिवंडीतील एपीजे अब्दुल कलाम ब्रिजवर पुन्हा एक अपघात घडला आहे. पाच वर्षाची चिमूरडी आपल्या वडिलांसोबत शाळेतून घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला चिरडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच वर्षाची चिमुकली जागीच मृत्युमुखी पडली तर डॉक्टर वडील देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घडलेल्या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओ व्हायरल होत आहे.