पुणे शहर: ल्याणी नगर, कोरेगाव पार्क, मुंढवा व खराडी परिसरातील पब, बार व रेस्टॉरंटना नोटीस
Pune City, Pune | Sep 16, 2025 पुणे शहरात अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग आला असून महापालिकेकडून पब व बारवरही कारवाई सुरू झाली आहे. कल्याणी नगर, कोरेगाव पार्क, मुंढवा व खराडी परिसरातील नियमबाह्य कामकाज करणाऱ्या १५१ पब, बार व रेस्टॉरंटना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.