श्रीवर्धन: श्रीवर्धन समुद्र किनारी आढळला भलामोठा बोया..पोलिस आणि डॉग स्कॉडचा तपास..नागरिकांचा सुटकेचा निश्वास..@raigadnews24
रायगडच्या श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी एक भलामोठा काळ्या रंगाचा बोया आढळला. हा बोया दिसताच नागरिकांमध्ये काही काळ भीतीयुक्त कुतूहल निर्माण झाले. प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली होती. तपासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार, बाणकोट ते बागमांडला दरम्यान सुरू असलेल्या खाडी पुलाच्या कामासाठी हा बोया वापरला जात होता. दरम्यान, त्याला बांधलेला दोर तुटल्याने हा बोया समुद्राच्या प्रवाहात वाहत येत श्रीवर्धन किनारी आला.