कारंजा येथील ग्रामदैवत आणि असंख्य भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या नरसिंह स्वरस्वती महाराज संस्थानात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप संस्थानाचे विश्वस्त निलेश घुडे यांनी पोलिसांकडे दाखल तक्रारीत केला आहे. घुडे यांच्या म्हणण्यानुसार, संस्थानात गेल्या काही वर्षांपासून नियमबाह्य कारभार सुरू असून, संस्थेच्या बैठका घेतल्या जात नाहीत. त्याऐवजी काही निवडक व्यक्तींनी मनमानी पद्धतीने निधीचा वापर करत भक्तांकडून आलेल्या दानाचे सोनं आणि रोकड गायब केली आहे.